बारामती-: जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणी अर्ज दाखल; नव्या चेहऱ्यांना संधी, प्रबळ दावेदारांना धक्का-पहा उमेदवार यादी..!


 बारामती | प्रातिनिधि

          जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले. दुपारी तीन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. उमेदवारी कोणाला मिळाली याबाबत कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट शेवटच्या दिवशी एकाचवेळी सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षाकडेच जमा करून त्यातील निवडक उमेदवारांचेच अधिकृत अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.


यावर्षीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून त्यामुळे अनेक प्रबळ दावेदारांना मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी उमेदवारीबाबत साशंकता असल्याने अनेकांनी अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केल्याचे दिसून येत आहे.


विशेष म्हणजे, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाशी युती करत इतर मित्र पक्षांनाही उमेदवारीत स्थान दिले आहे. यामुळे अजित पवार यांनी संतुलित राजकारण करत उमेदवार रिंगणात उतरवल्याची चर्चा असून या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांकडून दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे आहेत —


• सुपा गट : पल्लवी प्रमोद खेंडे

• सुपा गण : उज्वला पोपट खेंडे

• कान्हाटी गण : श्यामल बावळे

• गुणवडी गट : शुभांगी कचर शिंदे

शिरसुफळ गण : अनिकेत बाळासाहेब गावडे (भाजप)

गुणवडी गण : शुभांगी आगवणे

पांढरे गट : मंगेश प्रतापराव जगताप

पांढरे गण : किरण रावसाहेब तावरे

मुदाळे गण : वैशाली कोकणे

वडगाव निंबाळकर गट : रोहिणी संदीप कदम (ढोले)

वडगाव निंबाळकर गण : जितेंद्र पवार

मोर्गाव गण : रावसाहेब चोरमले

निंबूत गट : करण संभाजीराव खलाटे

निंबूत गण : दिग्विजय जगताप

कांबळेश्वर गण : आशा विठ्ठल वाघाळ

निरावागज गट : शिवानी अभिजीत देवकाते

निरावागज गण : नितीन काकडे

डोळेवाडी गण : राजश्री टकले


आगामी काळात उमेदवारी अर्ज छाननी आणि माघारीनंतर नेमके निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, या गुप्त रणनीतीचा राष्ट्रवादीला कितपत फायदा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान सुपा गणात उमेदवारी दिलेल्या उज्वला पोपट खेंडे व शिरसुफळ गणातील उमेदवार अनिकेत बाळासाहेब गावडे हे मात्र कोणत्या चिन्हावर लढणार हे मात्र समजले नाही. मात्र एकंदरीत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेत भाजपच्या ही तीन नेत्यांना सामावून घेतल्याने अजित पवारांनी महायुतीची देखील रणनीती स्पष्ट करून दाखवली आहे. अर्थात या निमित्ताने बारामतीतील विरोध संपवण्याचा प्रयत्न नगरपरिषेदसारखाच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील अजित पवारांनी केल्याचे दिसून येते.




Post a Comment

0 Comments